जयंत पाटील

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(जयंतराव पाटील या पानावरून पुनर्निर्देशित)
जयंत राजाराम पाटील

मतदारसंघ इस्लामपुर

जन्म फेब्रुवारी १६, इ.स. १९६२
सांगली सांगली जिल्हा, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
पत्नी शैलजा पाटील
अपत्ये राजवर्धन पाटील, प्रतिक पाटील
निवास साखराळे इस्लामपुर
धर्म हिंदू

जयंत राजाराम पाटील (फेब्रुवारी १६, इ.स. १९६२ - ) हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.

जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत.सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि महाराष्ट्र विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते देखील आहेत. जयंत पाटील हे शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जातात.विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात ते अर्थमंत्री होते.

मंत्री[संपादन]

राज्याचा सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात ते ग्रामविकासाचे कॅबिनेट मंत्री होते. 2008 साली मुंबईवर झालेल्या हल्ल्यानंतर तत्कालीन गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी राजीनामा दिला होता त्यानंतर जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात राज्याचे गृहमंत्री म्हणून पदभार स्वीकारला होता. त्यांनी सांगली जिल्ह्यात अनेक सहकारी संस्थांमार्फत ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना दिली आहे. ते 1990 पासून विधानसभेत इस्लामपूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांचे वडील स्व.राजारामबापू पाटील हे शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते होते. जयंत पाटील यांनी आपल्या नेतृत्वाखाली सांगली जिल्ह्यात अनेक विकासकामे केली आहे. जयंत पाटील हे महाराष्ट्र राज्याचे माजी जलसंपदामंत्री आहेत.

भुषविलेली पदे[संपादन]

  1. अर्थमंत्री
  2. ग्रामविकासमंत्री
  3. गृहमंत्री
  4. जलसंपदा मंत्री
  • पक्षात

जीवन[संपादन]

जयंत पाटील यांचा जन्म सांगली येथे झाला. राजारामबापू पाटील यांचे ते चिरंजीव आहेत. त्यांचे शिक्षण भारतात झाले सिविल इंजिनीअर आहेत. वडिलांच्या आकस्मित निधनानंतर त्यांना पुढील शिक्षण जे परदेशात घ्यायचे होते ते घ्यायला जाता आले नाही, नंतर ते शेकाप मधून राजकारणात रूजु झाले यानंतर त्यांनी शरद पवारांसोबत काँग्रेस मध्ये प्रवेश केला व नंतर राष्ट्रवादी असा प्रवास त्यांचा झाला. जयंत पाटील यांनी महाराष्ट्राचा नऊ वेळा अर्थसंकल्प मांडला आहे सध्या ते महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत महाराष्ट्रातील् 1 प्रमुख आणि महत्त्वाचं राजकारणी नेता म्हणून ओळख आहे. राजकारणातील राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाला उभारी आणि प्रसार करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.

संदर्भ[संपादन]