मायकेल शुमाकर (३ जानेवारी, इ.स. १९६९:हुर्थ, पश्चिम जर्मन - )हा फॉर्म्युला वन शर्यतीतील माजी चालक असून त्याने तब्बल सात वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. फॉर्म्युला वन स्पर्धा जिंकणारा तो पहिला जर्मन नागरिक असून त्याच्या यशामुळे ही स्पर्धा जर्मनी मध्ये फार लोकप्रिय झाली. २००६ सालाच्या फॉर्म्युला वन चहात्यांच्या सर्वेक्षणानुसार तो सर्वात लोकप्रिय चालक आहे.
‡ शुमाकरला १९९७ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदासाठी अपात्र घोषित करण्यात आले, कारण युरोपियन ग्रांप्रीच्या वेळेत त्याच्या खतरनाक पधतीने गाडी चालवल्यामुळे, त्याचा जॅक्स व्हिलनव्ह सोबत अपघात झाला, जो त्याला टाळता आला असता. त्याचे सर्व गुण रद्द करण्यात आले. जर हे घडले नसते तर तो त्या हंगामात दुसऱ्या क्रमांकावर आला असता.[१]† शर्यत पूर्ण नाही केली, परंतु ९०% शर्यत पूर्ण केल्यामुळे गुण मिळाले.