कुमुदच्या आईची लेक (पुस्तक)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कुमुदच्या आईची लेक हे कुमुद ओक यांनी वयाच्या ९२व्या वर्षी लिहिलेले आत्मचरित्र आहे.

या पुस्तकात ओक यांनी आपल्या आठवणी लिहिल्या आहेत तसेच विसाव्या शतकातून २१वे शतकात जाताना अनुभवलेली स्थित्यंतरे याबद्दलही लिहिले आहे.

कुमुद नारायण म्हसकर यांचा जन्म १९२० साली अंमळनेरमध्ये एका संपन्न कुटुंबात झाला. सुशिक्षित आणि प्रतिष्ठित कुटुंब असल्याने त्यांनी गावात राहूनही शिक्षण घेतले आणि क्रीडाक्षेत्रात नैपुण्य मिळवले. नंतर त्यांनी पुणे येथे महाविद्यालयीन शिक्षण घेऊन एसएनडीटी विद्यापीठात प्राध्यापकी केली. पुढे समाजवादी स्वातंत्रसैनिक रावसाहेब ओक यांच्याशी लग्न करून त्या नाशिक येथे राहण्यास गेल्या.