चर्चा:गोलाकार तारकागुच्छ

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

Retrograde Orbitसाठी परिपृच्छ कक्षा हा शब्द कधी ऐकला नव्हता.

संस्कृतमध्ये परि म्हणजे around, about, fully, abundantly, richly, beyond, according to, successively आणि towards वगैरे. त्यामुळे परिपृच्छचा अर्थ फारतर उलटतपासणी असा होईल. (खरे तर To परिप्रच्छ् म्हणजे चौकशी करणे, उलतपासणी घेणे.)

योग्य शब्द पुच्छगामी किंवा पश्चगामी असावा. 'परि' हा उपसर्ग वापरायचाच असेल Retrograde Orbitसाठी 'परिपुच्छ कक्षा' (towards tail-backwards) हा शब्द चालावा त्यासाठी `परिपृच्छ कक्षा' वापरणे पटत नाही.

शनी वक्री होतो त्या घटनेला Retrogradation of Saturn म्हणतात. त्यावेळी शनी पुढच्या नक्षत्रातून आधीच्या नक्षत्राकडे येतो.

परिपृच्छ जेथून घेतला तेथे तो मुद्रणदोष असावा. .... (चर्चा) २१:४४, २५ एप्रिल २०१६ (IST)[reply]

@: पुच्छगामी किंवा पश्चगामी बरोबर आहे. परिपृच्छ कुठे वाचला किंवा कसा सुचला ते आता आठवत नाही. सुधारणा केली आहे. लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. ... प्रथमेश ताम्हाणे (चर्चा) ०१:४६, २६ एप्रिल २०१६ (IST)[reply]

>अनेक गोलाकार तारकागुच्छ आकाशगंगेभोवती पुच्छगामी कक्षेमध्ये (रेट्रोग्रेड ऑर्बिट) फिरतात.[२१] . >

गोलाकार तारकागुच्छ आकाशगंगेभॊवती फिरतात? आकाशगंगा केवढी मोठी, तिच्याभोवती फिरण्यासाठी किती मोठी कक्षा लागेल? आणि त्यांतूनही काही तारकागुच्छ एका दिशेने फिरतात आणि काही विरुद्ध!

> होय. इतर जवळपास सर्व गोष्टी तारे, ग्रह, धूळ, वायू वगैरे एकत्रितरित्या आकाशगंगेच्या तबकडीमध्ये एकाच दिशेने फिरतात. पण अनेक गोलाकार तारकासमूह मात्र दीर्घिकेच्या केंद्रकाभोवती तबकडीशी कललेल्या लंबवर्तुळाकार कक्षेमध्ये फिरतात. त्यांच्या कक्षेची सरासरी त्रिज्या काही शे पार्सेकपासून ~६०-१०० किलोपार्सेक पर्यंत असू शकते (आकाशगंगेच्या व्यासापेक्षा जास्त). म्हणून अश्या गोष्टींची निर्मिती नेमकी कशी झाली हा प्रश्न अनुत्तरित आहे. त्यांना आकाशगंगेभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करायला सरासरी १० वर्षे लागतात.

>२०१४ मध्ये एम८७ दीर्घिकेभोवती उच्च गतीच्या गोलाकार तारकागुच्छाचा शोध लागला. त्याची गती एम८७ च्या मुक्ति वेगापेक्षा जास्त आहे.<

दीर्घिकेभोवती या शब्दानंतर 'फिरणाऱ्या' शब्द गळाला आहे? की 'उच्च गतीने फिरणाऱ्या' हवे होते? गती उच्च असते की द्रुत (जलद)? ... (चर्चा) २०:५४, २६ एप्रिल २०१६ (IST)[reply]

> 'फिरणाऱ्या' शब्द गळालेला नाही. खगोलशास्त्रज्ञांना एम८७ दीर्घिकेजवळ एक वेगवान गोष्ट आढळली. निरीक्षाणांवरून ती गोष्ट गोलाकार तारकासमूह आहे असे आढळले. कधी काळी तो एका ठराविक कक्षेमध्ये फिरत असेल पण काही कारणांमुळे त्याची गती वाढली आहे आणि तो दीर्घिकेच्या बाहेर फेकला जात आहे.