दालन:क्रीडा/temp

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


क्रीडा

क्रिडा आणि खेळ
क्रिडा आणि खेळ

क्रीडा म्हणजे सर्वमान्य नियमांद्वारे चालणारी व मनोरंजनाचे उद्दिष्ट असणारी कौशल्यपूर्ण शारीरिक क्रिया होय. स्पर्धेसाठी, विरंगुळ्यासाठी, श्रेष्ठता गाठण्यासाठी, कौशल्य विकसवण्यासाठी किंवा हे सर्व हेतू क्रीडेमध्ये समाविष्ट असू शकतात. क्रीडेच्या उद्देशांमधील फरक वा गुणदोष, हे यातील प्रत्येक व्यक्तिपरत्वे (किंवा संघापरत्वे) कुशलता किंवा हेतू मनात ठेवून करण्यामुळे उद्भवू शकतात.

संक्षिप्त सूची

विशेष लेख

२०१० फिफा विश्वचषक स्पर्धेचे मानचिह्न
२०१० फिफा विश्वचषक स्पर्धेचे मानचिह्न

२०१० फिफा विश्वचषक ही जून ११ ते जुलै ११, इ.स. २०१० दरम्यान खेळली गेलेली जगातील अग्रणीय फुटबॉल स्पर्धा होती. दक्षिण आफ्रिकेत खेळली गेलेली ही स्पर्धा फिफा विश्वचषक स्पर्धेची १९वी आवृत्ती होती. ही स्पर्धा प्रथमच आफ्रिकेत खेळली गेली. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी फिफाच्या २०८ सदस्य राष्ट्रांपैकी २०४ राष्ट्रांनी भाग घेतला. पात्रता फेरी ऑगस्ट २००७ पासून सुरू होती. स्पेनने अंतिम सामन्यात नेदरलँड्सवर १-० ने मात करून विजेतेपद मिळवले.

स्पर्धेतील प्रत्येक संघाला सामने सुरू होण्याआधीच १० लक्ष अमेरिकन डॉलर देण्यात आले. साखळी सामन्यांनंतर बाहेर पडलेल्या संघांना प्रत्येकी ८० लाख डॉलर मिळाले. झाकुमी हा १५ वर्षे वयाचा मानवसदृश चित्ता २०१० फिफा विश्वचषक स्पर्धेचा प्रतिनिधी होता. अदिदास या कंपनीने तयार केलेला जबुलानी हा चेंडू स्पर्धेत वापरण्यात आला. इसिझुलू भाषेत जबुलानीचा अर्थ सगळ्यांना आनंदित करणारा असा होतो.

दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू सिफिवे शबलल याने स्पर्धेतील पहिला गोल स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात मेक्सिको (१-१) विरूध्द केला. स्पर्धेतील पहिला स्व गोल नेदरलँड्स (०-२) विरूध्दच्या सामन्यात डॅनिश मिडफिल्डर डॅनियल एगरकडून झाला. आर्जेंटिनाचा स्ट्रायकर गोंझालो हिगुएन याने स्पर्धेतील सर्वप्रथम हॅट्रीक दक्षिण कोरिया (४-१) विरूध्द केली.

पुढे वाचा...

Sport in Focus

फुटबॉल हा जगातील सर्वांत लोकप्रिय खेळ आहे. फुटबॉलच्या संघात अकरा खेळाडूंचा समावेश असतो. हा मैदानी खेळ मुख्यतः हिरवळ असलेल्या मैदानात खेळला जातो. मैदानाच्या दोन टोकांना उभारलेल्या गोलजाळ्यात चेंडू पोहोचवणे असे या खेळाचे उद्दिष्ट आहे. गोलरक्षक वगळता इतर दहा खेळाडूंनी चेंडूला हात लावणे नियमबाह्य ठरते. जो संघ अधिक वेळा गोलजाळ्यात चेंडू पोहोचवेल (गोल करेल) तो संघ विजेता ठरतो.

इ. स. १८६३ साली फुटबॉल असोसिएशन या इंग्लंडमधील संघटनेने फुटबॉल खेळास नियमबध्द केले. आंतरराष्ट्रीय सामन्यांचे आयोजन फेडरेशन इंटरनॅशनेल डे फुटबॉल असोसिएशन (फिफा) ही संघटना करते. या खेळातील अत्यंत लोकप्रिय स्पर्धा फुटबॉल विश्वचषक होय.

अधिक माहिती..



बदला

सद्य क्रीडा स्पर्धा

Gola fek

-->

सद्य क्रिकेट स्पर्धा
सद्य हॉकी स्पर्धा‎
सद्य इतर स्पर्धा
gola fek

महत्वाच्या स्पर्धा

तुम्ही काय करू शकता

नविन लेख
विस्तार